India-Australia Border-Gavaskar Trophy 2024-25
भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 : उत्सुकतेचा शिगेला
पोहचलेली मालिका
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मालिका 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळली जाणार आहे . ही मालिका पाच कसोटी सामन्यांची असणार आहे , ज्यामध्ये भारतीय क्रिकेटसंघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मातीत नमवण्याचा निर्धार केला आहे .
भारत-अ आणि ऑस्ट्रेलिया-अ यांच्यातील नुकत्याच झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया-अ संघाने भारत-अ संघावर 2-0 असा विजय मिळवला. या मालिकेत नॅथन मॅकस्विनीने उत्कृष्ट कामगिरी केली असून त्याला ऑस्ट्रेलिया संघात समाविष्ट करण्यात आले आहे . मॅकस्विनीने भारत – अ विरुद्ध खेळलेल्या मालिकेत चार डावात ५५.३३ च्या सरासरीने १६६ धावा केल्या आहेत.
कोण आहे नॅथन मॅकस्विनी ?
नॅथन मॅकस्विनी हा एक युवा ऑस्ट्रेलियन सलामीवीर आहे.डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाच्या सलामी फलंदाजासाठी मॅकस्विनीला
महत्त्वाची संधी मिळाली आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये आणि ऑस्ट्रेलिया-अ संघासाठी त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे त्याची निवड झाली आहे. मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी सांगितले की, मॅकस्विनीची निवड त्याच्या अपारंपरिक खेळामुळे झाली आहे आणि भविष्यात तो ऑस्ट्रेलियाचा स्थायी सलामीवीर ठरू शकतो.
ऑस्ट्रेलियाचा संघ
ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली संघाची घोषणा केली असून नॅथन मॅकस्विनीचा समावेश हा टीम इंडियासाठी एक मोठे सरप्राईज ठरू शकते. पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात काही महत्त्वाच्या खेळाडूंचा समावेश आहे .
कर्णधार : पॅट कमिन्स स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्विनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.
भारताचा संघ
कसोटी मालिकेसाठी भारतानेही आपला संघ सज्ज केला आहे.
कर्णधार : रोहित शर्मा
उपकर्णधार : जसप्रीत बुमराह
– यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, आर. मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा वेळापत्रक
पहिली कसोटी : 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी : 06-10 डिसेंबर, ॲडलेड
तिसरी कसोटी : 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी : 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी : 3-7 जानेवारी, सिडनी
आता पाहावे लागेल की कोणता संघ या बहुप्रतिक्षित मालिकेत बाजी मारतो.