महाविकास आघाडीचा जाहीरनामा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी जाहीर .
महाविकास आघाडीचा जाहीरनामा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आला आहे .
मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या २०२४ निवडणुकांचा प्रचार जोरात सुरु असताना महाविकासआघाडीने आपल्या ‘महाराष्ट्रनामा‘ या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले आहे. महाविकासआघाडीच्या प्रमुख नेत्यांसह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा मुंबईत जाहीर करण्यात आला. राज्यातील शेतकरी, महिला, तरुण आणि आरोग्यक्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण योजना आणि आश्वासने यामध्ये दिली गेली आहेत.
महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासने
महाविकास आघाडीच्या या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी 3 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची सूट देण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकरी आत्महत्यांच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी
उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. शेतमालाला हमीभाव मिळावा आणि पीकविम्यातील जाचक अटी काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.
रोजगार आणि शिक्षणासाठी योजना
महाविकास आघाडीने बेरोजगार तरुणांना दरमहा 4 हजार रुपयांचे मानधन देण्याचे वचन दिले आहे. राज्यात अडीच लाख सरकारी नोकऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया सुरु केली जाईल. यासोबतच बार्टी, महाज्योती आणि सारथी संस्थांच्या शिष्यवृत्ती योजनांना व्यापक स्वरुप देण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसेच एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लागतील अशी तरतूद करण्यात येईल.
आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा योजनांचे आश्वासन
महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट जाहीरनाम्यात दिले आहे. महायुती सरकारच्या कालावधीत जाहीर करण्यात आलेले पक्षपाती अध्यादेश रद्द करण्याची घोषणा मविआने केली आहे. याशिवाय शहरीकरणाला योग्य दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करण्यात येणार आहे.
पहिल्या 100 दिवसांत काय करणार ?
महिलांसाठी महालक्ष्मी योजनेअंतर्गत दरमहा 3 हजार रुपयांचा निधी दिला जाईल, तसेच महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा देण्यात येईल. याशिवाय सहा घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयांत देण्याचे आश्वासन आहे. महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात दोन दिवसांची ऐच्छिक रजा देण्यात येईल. जन्मलेल्या प्रत्येक मुलीसाठी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1 लाख रुपये दिले जातील.
महाविकास आघाडीचा ‘महाराष्ट्रनामा‘ राज्यातील नागरिकांसाठी एक व्यापक जाहीरनामा आहे. त्यात सामाजिक बदलांसोबत आर्थिक विकास,आरोग्य सुरक्षा, महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाच्या संधी या सर्वच बाबींचा समावेश आहे. महाविकास आघाडीने या जाहीरनाम्यातून महाराष्ट्राची निवडणूक अत्यंतमहत्त्वाची असल्याचा संदेश दिला आहे.
काही ठळक मुद्दे
बेरोजगारीवर उपाय
सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ४ हजार रुपयांचे मानधन देण्याची घोषणा तसेच अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार असल्याचे
जाहीरनाम्यात नमूद केले आहे. बार्टी, महाज्योती, आणि सारथी संस्थांच्या माध्यमातून शिष्यवृत्तीत वाढ करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
शासकीय प्रक्रिया आणि आरोग्य सेवा
एमपीएससी परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत लावण्याची प्रक्रिया सुरु करणार असून, महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्धार आहे. यासोबतच महायुती सरकारचे पक्षपाती अध्यादेश रद्द करून, खाजगी व्यक्तींना दिलेल्या भूखंडांवर फेरविचार केला जाणार आहे.
नागरीकरण आणि सहकार क्षेत्रात सुधारणा
शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करण्याचे तसेच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याचे आश्वासनआघाडीने दिले आहे.
महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात या घोषणांमुळे शेतकरी, बेरोजगार आणि नागरिकांनादिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.